प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक कार्यक्रम संपन्न

प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक कार्यक्रम संपन्न
चोपडा, दि. २७ जुलै : चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित,
प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, चोपडा येथे शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी शालेय विद्यार्थी संसद प्रतिनिधी (School Parliament) निवडणूक आज अत्यंत उत्साहपूर्ण, शांततापूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीपणे पार पडली.
विद्यार्थ्यांनी लोकशाही मूल्यांची जाणीव ठेवत मोठ्या उत्साहाने विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री. रजीश बी. सर, उपमुख्याध्यापिका निखिला मॅम यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. मतदान प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी रांगेचे नियोजन, शिस्त आणि जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले. यात विद्यार्थ्यांनी अनमोल सहकार्य केलं.शाळेच्या निवडणूक समितीने संपूर्ण मतदान प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी योग्य नियोजन केले होते. यामध्ये जनरल सेक्रेटरी,हेड बॉय,हेड गर्ल,हाऊस कॅप्टन, हाऊस व्हाइस कॅप्टन, स्पोर्ट्स कॅप्टन, व्हाइस स्पोर्ट्स कॅप्टन असे विविध पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.
यावेळी विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही, नेतृत्वगुण, जबाबदारीची भावना आणि मतदानाचे महत्त्व याबाबत जागरूकता निर्माण झाली.
शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक यशस्वीरीत्या पार पडली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लोकशाही प्रक्रियेचा अनुभव मिळाला असून, भविष्यात जबाबदार व जागरूक नागरिक घडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरेल.







