Other

स्वातंत्र्य दिनानिमित्त हुतात्म्यांना रक्तदानाने वंदन

रेडक्रॉस सोसायटी व मुक्ती फाउंडेशनचा विशेष उपक्रम; शतकवीर रक्तदाता मुकुंद गोसावी यांची रक्तदानातून आदरांजली

स्वातंत्र्य दिनानिमित्त हुतात्म्यांना रक्तदानाने वंदन

रेडक्रॉस सोसायटी व मुक्ती फाउंडेशनचा विशेष उपक्रम; शतकवीर रक्तदाता मुकुंद गोसावी यांची रक्तदानातून आदरांजली

जळगाव : देशाला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी असंख्य वीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. या अमर हुतात्म्यांच्या त्यागाला अभिवादन करण्यासाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटी (रक्तकेंद्र) आणि मुक्ती फाउंडेशनच्या वतीने रक्तदानाचा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे.

मुकुंद गोसावी यांचे रक्तदान

१५ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा आठ वाजता रेडक्रॉस भवन येथे आपल्या शारीरिक व्यंगावर मात करत शतकवीर रक्तदाता मुकुंद गोसावी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करणार आहेत. रक्तदानाच्या माध्यमातून वीर हुतात्म्यांना विनम्र आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.

वर्षभर रक्तदानाचे आवाहन

शहरासह जिल्ह्यातील सामाजिक, सेवाभावी संस्था, प्रतिष्ठाने, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांची आठवण म्हणून केवळ स्वातंत्र्य दिनापुरते मर्यादित न राहता वर्षभर रक्तदान सेवेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गरजू रुग्णांना जीवनदान देण्याचे आवाहन

रक्ताची गरज असलेल्या गंभीर व पीडित रुग्णांसह थॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल आणि रक्तक्षयाने त्रस्त रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी नागरिकांनी रक्तदानाच्या पवित्र कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

“हुतात्म्यांना खरी आदरांजली त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवून गरजूंचे प्राण वाचविण्याच्या कार्यात सहभागी होण्यात आहे. नागरिकांनी रक्तदान करून या सेवाकार्यात योगदान द्यावे.”

— मुकुंद गोसावी, शतकवीर रक्तदाता
इंडियन रेडक्रॉस सोसायटी (रक्तकेंद्र) व मुक्ती फाउंडेशन

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button