Other

अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त म्युनिसिपल हायस्कूलमध्ये अभिवादन

अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त म्युनिसिपल हायस्कूलमध्ये अभिवादन

भुसावळ, प्रतिनिधी : नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल, भुसावळ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन व आदरांजलीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस, तर सेवाज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. त्यानंतर उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली.

यावेळी सरला सावकारे, संध्या धांडे, डॉ. प्रदीप साखरे व संजीव चौधरी यांनी विद्यार्थ्यांना अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक परिवर्तनातील योगदान तसेच श्रमिक व वंचित समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच लोकमान्य टिळक यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंतीच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचे कार्य आणि “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” या घोषणेचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक व्ही. पी. सुलताने यांनी अण्णाभाऊ साठे हे समाजजागृती करणारे क्रांतिकारी साहित्यिक तर लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थान असल्याचे सांगितले. या दोन्ही महापुरुषांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करून त्यांच्या आदर्शांचा जीवनात अंगीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी सेवाज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे, शालिनी बनसोडे, डॉ. प्रदीप साखरे, वरिष्ठ लिपिक प्रविण चौधरी, ग्रंथपाल अरुण नेटके यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. एच. राठोड यांनी केले, तर आभार प्रदर्शन पुनम देवकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डी. के. भंगाळे, नाना पाटील, मनोज किरंगे, निलेश बोराडे, ज्योती शिरतुरे, रेखा सोनवणे, लक्ष्मण पवार, राजेंद्र बागुल व रोहन पाटील यांनी परिश्रम घेतले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button