CrimePolitics

डोंबिवलीतील महिला डॉक्टर मारहाण प्रकरणाचा रोहिणी खडसे यांचा निषेध

डोंबिवलीतील महिला डॉक्टर मारहाण प्रकरणाचा रोहिणी खडसे यांचा निषेध

दोषींवर कठोर कारवाईची मागणी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आवाहन

मुंबई | प्रतिनिधी

डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात कर्तव्य बजावत असलेल्या महिला डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांना आवाहन

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून, कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याकडे गांभीर्याने पाहून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे आवाहन केले आहे.

महिलांवरील हिंसाचार अस्वीकार्य

कर्तव्य बजावत असलेल्या महिला डॉक्टरला मारहाण होणे ही गंभीर बाब असून अशा घटनांमुळे आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महिलांवरील कोणत्याही प्रकारचा हिंसाचार सहन केला जाणार नाही आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button