Other

‘मोतीबिंदू मुक्त जळगाव ग्रामीण’ अभियानांतर्गत ६०० पात्र लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप

‘मोतीबिंदू मुक्त जळगाव ग्रामीण’ अभियानांतर्गत ६०० पात्र लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप

जळगाव: समाजहित आणि जनसेवेला समर्पित असलेल्या ‘मोतीबिंदू मुक्त जळगाव ग्रामीण’ अभियानांतर्गत आज ६०० पात्र लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

जीपीएस (GPS) ग्रुपच्या विशेष सहकार्याने हा समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत झालेल्या तपासणीत पात्र ठरलेल्या शेकडो नागरिकांना व वृद्धांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना . प्रतापराव पाटील यांनी सांगितले की, “ग्रामीण भागातील नागरिकांना दृष्टीदोषामुळे दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रत्येकाला स्पष्ट दृष्टी मिळावी आणि कोणाचेही जीवन अंधारमय राहू नये, या हेतूने पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सातत्याने राबवले जात आहे.”

या उपक्रमामुळे मोफत चष्मे मिळालेल्या शेकडो नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण दिसून आले. स्पष्ट दृष्टीसोबतच नव्या आशेची भेट देणारा हा उपक्रम जळगाव ग्रामीण भागातील समाजहितासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कौतुकास्पद पाऊल ठरत आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button