Other

जळगाव जिल्ह्यातील ५३ हजार ८९६ पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; अग्रीस्टॅक फार्मर आयडी अनिवार्य

जळगाव जिल्ह्यातील ५३ हजार ८९६ पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; अग्रीस्टॅक फार्मर आयडी अनिवार्य

जळगाव, : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, जिल्ह्यातील एकूण ५३ हजार ८९६ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. या सर्व पात्र लाभार्थ्यांनी कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी तातडीने आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. तसेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमधील पात्र शेतकऱ्यांची यादी २४ जुलै २०२६ रोजी प्राप्त झाली असून, संबंधित संस्थांचे सचिव, संस्थांची कार्यालये आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमध्ये ही यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांकडे अग्रीस्टॅक (AgriStack) फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अग्रीस्टॅक नोंदणी केलेली नाही, त्यांनी तात्काळ जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र (CSC) येथे जाऊन नोंदणी करून घ्यावी.

तसेच, कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या आपले सरकार केंद्र, सीएससी केंद्र किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया जिल्ह्यातील सर्व संबंधित केंद्रांवर उपलब्ध करण्यात आली आहे.

आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून, यासाठी कोणत्याही केंद्रावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. पात्र लाभार्थ्यांनी कोणालाही कोणतीही रक्कम देऊ नये, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक महेशकुमार गायकवाड यांनी केले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button