Crime

चहार्डी येथे शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या १२ जणांवर गुन्हा दाखल

चोपडा (प्रतिनिधी) – चोपडा तालुक्यातील चहार्डी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवर सुरु असलेल्या शासकीय व्यापारी गाळ्यांच्या5 बांधकामात अडथळा आणल्याप्रकरणी गावातील बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामसेवकाच्या तक्रारीनुसार चोपडा शहर पोलीस ठाण्यात ही नोंद करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतीच्या मालमत्ता मिळकत क्र. 2084, क्षेत्रफळ 1323 चौ. फूट जागेवर गाळ्यांच्या कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू होते. स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना गावातील काही व्यक्तींनी गैरकायद्याची गर्दी जमवून सरपंच सौ. चंद्रकला दत्तात्रेय पाटील यांना धक्काबुक्की केली. तसेच उपस्थित ग्रामपंचायत सदस्यांनाही शिवीगाळ करत काम बंद करण्याची धमकी दिली.

या प्रकरणात तुळशीराम धनराव कोळी, गोपाल धनराज कोळी, सौ. कोमल बापुराव पाटील, अमोल खंडेराव पाटील, दिपक जगन्नाथ धनगर, प्रशांत नामदेव चौधरी, नाना लुका धनगर, सचिन ईश्वर कोळी, अशोक लांटन पाटील, खंडेराव दशरथ पाटील, नामदेव दामु चौधरी आणि दर्शन ईश्वर पांचाळ (सर्व रा. चहार्डी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी बापू भागवत कोळी यांच्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता कलम 189(21), 132, 221, 121(1), 352, 351(2)(3) नुसार कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पो.नि. सो यांच्या आदेशानुसार पो.उपनि. अनिल रघुनाथ भुसारे करत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button