
चाळीसगाव : चाळीसगाव नगरपरिषदेमार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना’ (PMFME) अंतर्गत एका लघु अन्न प्रक्रिया उद्योगाच्या युनिटचे उद्घाटन आज, ७ ऑगस्ट २०२५ रोजी झाले.
यावेळी प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी रोशन राजपूत यांच्या हस्ते या युनिटचे उद्घाटन करण्यात आले. नगरपरिषदेच्या ‘राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान’ (NULM) विभागाने या उद्योगासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले आहे.
या कार्यक्रमाला उपमुख्याधिकारी आशिष लोकरे, बँक ऑफ बडोदाचे अधिकारी अमित लालसरे आणि राजू लहासे, PMFME योजनेचे DRP विनोद देशपांडे, तसेच NULM विभागाचे शहर समन्वयक किरण निकुंभ, सोनाली मोगलाईकर आणि शितल पाटील उपस्थित होते.
ही योजना स्थानिक स्तरावर स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करते आणि उद्योजकांना आवश्यक भांडवली मदत पुरवते, ज्यामुळे आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळते.






