Social

अ..भा. सुवर्णकार समाज विकास एवं शोध संस्थान संघटनेच्या भडगांव तालुकाध्यक्षपदी प्रकाश सोनार

भडगांव प्रतिनिधी ;- अखिल भारतीय सुवर्णकार समाज विकास व संशोधन संस्थान दिल्ली, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या भडगांव तालुका अध्यक्ष प्रकाश जनार्धनशेठ सोनार यांची निवड करण्यात आली.

या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम.के.राजपुत सर, पुष्पाताई सोनार-राष्ट्रीय महीला अध्यक्ष, यांच्या आदेशानुसार किरणशेठ भामरे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्ती साठी प्रकाश सोनार यांना ज्येष्ठ पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, ता.अध्यक्ष, तथा समाजातुन अभिनंदनास्पर वर्षाव होत आहे. समाजामध्ये समाजाला प्रेरीत असे काम व समाजाप्रती काम करण्याची जिद्द, धडपड तथा कायम समाजाला वाहुन घेण्याची तत्परता यामुळे संघटनेला सदैव सोबत घेऊन व पदाधिकारी यांचा मार्गदर्शनाखाली कार्य करण्याची जबाबदारी देऊन नियुक्ती करण्यात आली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button