जळगाव येथे शाह ट्रेडर्सतर्फे कवी संमेलन उत्साहात

जळगाव :- : , शाह ट्रेडर्स तर्फे अब्दुल रहीम रज़ा यांच्या नावाने आणि एक शाम स्वर्गीय अहमद आजीज़ बियावली यांच्या नावाने कवी सम्मेलन एमआयडीसीतील साईनगर गेट येथे आयोजित केले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुश्ताक करीमी होते. कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर मुशायराची सुरुवात केली.
या कार्यक्रमाला डॉ. वसीम शाह , इलियास शाह साहब, अकरम देशमुख , इरफान सर साहब, सईद इंजीनियर , फारुख कादीरी आधी प्रमुख उपस्थित होते.
निमंत्रित कवींमध्ये साईद जिलानी, अशफाक निज़ामी, अखलाक निज़ामी, अकरम कुरैशी, ज़मीर हाशमी, हनिफ आदिल, मिर्झा नदीम अफसर, प्रोफेसर इम्रान फारिस, तबरेज़ कामिल, डॉ. फैज़ान उमर, सरफराज़ सैय्यद, फिरोज अकमल यांनी आपली कविता सादर केल्या.
मुशायरेत हारून उस्मानी , साबीर आफाक , वाहिद गाज़ी , इम्रान उमर या शायर आणि कवींची उपस्थिती होती.
मुशायरेचे उत्साही शाह ट्रेडर्सचे शाह मसूद साहब, रागिब बियावली , शाह तबरेज़ कामिल, जुनैद मसूद, उबेद शाह यांनी परिश्रम घेतले.