Other

श्री मंगळग्रह मंदिरात २४ नोव्हेंबरला तुळशी विवाह सोहळा

श्री मंगळग्रह मंदिरात २४ नोव्हेंबरला तुळशी विवाह सोहळा

पारंपरिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने आयोजन; भाविकांना उपस्थितीचे आवाहन

अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंगळवार, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी श्री तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी दुपारी १२.१५ वाजता मंगलाष्टके, तर सायंकाळी ७.१५ वाजता तुळशी विवाह सोहळा होणार आहे.

विवाह सोहळ्यात साधेपणाचा आदर्श

मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे विवाह सोहळे विधिवत, पारंपरिक पद्धतीने आणि अनावश्यक खर्च टाळून साधेपणाने करण्याबाबत जनजागृती केली जाते. याच उपक्रमाचा भाग म्हणून मंदिरातील तुळशी विवाह सोहळा गेल्या काही वर्षांपासून अत्यंत साध्या पद्धतीने, मात्र हिंदू संस्कृतीतील परंपरा आणि धार्मिक विधींचे पालन करून साजरा केला जात आहे.

भव्य सजावट आणि स्नेहभोजन यावर अनावश्यक खर्च न करता भगवान श्रीविष्णू आणि माता लक्ष्मी यांचा हा पवित्र विवाह सोहळा पूर्णतः शास्त्रोक्त पद्धतीने पार पडणार आहे. साधेपणा, धार्मिक परंपरा आणि अनावश्यक खर्चाला फाटा देण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.

या तुळशी विवाह सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button