Other

मारवड-गोवर्धन स्मशानभूमीत अंधार; ट्रॅक्टरच्या हेडलाइटमध्ये अंत्यसंस्कार

पथदिवे बसवूनही बंदच; ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे ग्रामस्थांमध्ये संताप

मारवड-गोवर्धन स्मशानभूमीत अंधार; ट्रॅक्टरच्या हेडलाइटमध्ये अंत्यसंस्कार

पथदिवे बसवूनही बंदच; ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे ग्रामस्थांमध्ये संताप

मारवड I महा पोलीस न्यूज : मारवड व गोवर्धन स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तसेच स्मशानभूमी परिसरात बसविण्यात आलेले विद्युत पथदिवे बंद असल्याने ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पथदिवे बसवूनही ते सुरू करण्यात आले नसल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. संबंधित ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ट्रॅक्टरच्या हेडलाइटमध्ये अंत्यसंस्कार

या समस्येचा गंभीर अनुभव नुकताच ग्रामस्थांना आला. एका तरुणाचे निधन झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला. मात्र, परिसरातील विद्युत पथदिवे बंद असल्याने अंत्यसंस्काराची संपूर्ण प्रक्रिया ट्रॅक्टरच्या हेडलाइटच्या प्रकाशात पार पाडावी लागली. दुःखाच्या प्रसंगीही ग्रामस्थांना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागल्याने संताप व्यक्त होत आहे.

पाठपुरावा करूनही काम रखडले

संबंधित ठेकेदाराकडे यापूर्वीही वारंवार दूरध्वनीद्वारे पाठपुरावा करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र, आज काम करतो, उद्या करतो, अशी उत्तरे देत काम लांबणीवर टाकले जात असल्याची तक्रार आहे. पथदिवे बसवूनही ते सुरू होत नसतील, तर या कामाचा उपयोग काय, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

स्मशानभूमीसारख्या संवेदनशील ठिकाणी रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश असणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने या समस्येची तातडीने दखल घेऊन पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button