Other

यूपीएससी मुख्य परीक्षा व मुलाखत पूर्वतयारीसाठी ‘अमृत’कडून अर्थसहाय्य योजना; 17 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

यूपीएससी मुख्य परीक्षा व मुलाखत पूर्वतयारीसाठी ‘अमृत’कडून अर्थसहाय्य योजना; 17 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) तर्फे राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तसेच अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांसाठी संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा मुख्य परीक्षा व मुलाखत पूर्वतयारीसाठी प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य योजना 2026–27 राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.

या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तसेच अमृतच्या लक्षित गटातील उमेदवारांना मुख्य परीक्षा व मुलाखत पूर्वतयारीसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी प्रत्येकी 50 हजार रुपये तर मुलाखत तयारीसाठी पात्र उमेदवारांना 25 हजार रुपये इतके अर्थसहाय्य प्रदान करण्यात येणार आहे.

अमृतच्या लक्षित गटामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पाटील, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुंथर, गुजराती, जाट, हिंदू नेपाळी, भूमिहार, लोहारणा, कानबी यांसह विविध समाजघटकांचा समावेश आहे.

योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा 2026 उत्तीर्ण झाल्यानंतर अधिकृत सूचना काळजीपूर्वक वाचून ऑनलाइन अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जुलै असून उमेदवारांनी https://mahaamrut.org.in/ या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. योजनेबाबत अधिक माहिती, सूचना व अद्यतने संकेतस्थळावर उपलब्ध राहतील.

ऑनलाइन अर्ज प्रक्रियेत अडचण असल्यास संबंधित जिल्हा अमृत कार्यालयाशी 7391065476 / 8237657178 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अमृत कार्यालयाचे व्यवस्थापक राजेंद्र कानडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button