ट्रक-आयशरच्या भीषण अपघातात चालक ठार; तिघे गंभीर जखमी

ट्रक-आयशरच्या भीषण अपघातात चालक ठार; तिघे गंभीर जखमी
चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाजवळ दुर्घटना
चाळीसगाव प्रतिनिधी – चाळीसगाव तालुक्यातील वाघळी गावाजवळ मंगळवारी (४ मार्च) सकाळी ट्रक आणि आयशरच्या समोरासमोर धडकेने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत आयशर चालक समाधान मेघराज पाटील (रा. तांबोळा खुर्द) यांचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रक चालकासह आणखी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची तीव्रता; जेसीबीच्या मदतीने बचावकार्य
अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांच्या समोरील भागाचा चुराडा झाला. जखमींना बाहेर काढण्यासाठी जेसीबी आणि क्रेनचा वापर करावा लागला.स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य हाती घेतले.
या अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक तब्बल एक तास ठप्प झाली होती.पोलिसांनी घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली.शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या घटनेची पोलिस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.