Other

भाजपा युवा मोर्चा भडगाव तालुका सरचिटणीस पदी विवेक पवार यांची नियुक्ती

भाजपा युवा मोर्चा भडगाव तालुका सरचिटणीस पदी विवेक पवार यांची नियुक्ती

भडगाव प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाकडून संघटनात्मक पातळीवर नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून, यामध्ये विवेक पवार यांची भाजपा युवा मोर्चा भडगाव सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे वृत्त समजताच भडगाव शहर व परिसरातील राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा मोठा वर्षाव होत आहे. विवेक दादा पवार समाजकारणात व राजकारणात खंबीरपणे एक डॅशिंग नेतृत्व असून त्यांची राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात नेहमी ते मुख्य भूमिका बजावत असतात.
त्यांचा जनसंपर्क मोठा आहे.
त्यांची सामाजिक, राजकीय आणि संघटनात्मक कारकीर्द अत्यंत प्रभावी राहिली आहे. यापूर्वी सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये कार्य करताना त्यांनी विविध स्तरांवरील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अत्यंत यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्या याच कामाचा आणि अनुभवाचा विचार करून पक्षाने त्यांच्यावर ही नवीन जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे भडगाव शहर व तालुक्यातील पक्ष संघटनेला आणखी बळ मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन खासदार स्मिताताई वाघ आमदार मंगेशदादा चव्हाण भाजपचे जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, महिला नेत्या वैशालीताई सूर्यवंशी, युवानेते अमोलभाऊ शिंदे, किसान संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, पीटीसी चेअरमन संजय वाघ किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस सोमनाथ पाटील, भाजपा मंडळ अध्यक्ष विनोद नेरकर माजी नगराध्यक्ष प्रशांतभाऊ पवार, भाजपा नेते अनिल वाघ, नगरसेवक सचिन चोरडिया भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष चेतन पाटील

यांच्यासह सर्व नगरसेवक व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन केले आहे…

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button