PoliticsSocial

गांधली सहकारी संस्थेच्या इतिहासात प्रथमच ‘महिलाराज’; चेअरमनपदी प्रतिभा पाटील, उपाध्यक्षपदी नलिनी देशमुख

गांधली सहकारी संस्थेच्या इतिहासात प्रथमच ‘महिलाराज’; चेअरमनपदी प्रतिभा पाटील, उपाध्यक्षपदी नलिनी देशमुख

दोन्ही पदांवर महिलांची बिनविरोध निवड; गावात पेढे वाटून आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष

अमळनेर, प्रतिनिधी : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित, गांधली (ता. जि. जळगाव) येथे संस्थेच्या इतिहासात प्रथमच चेअरमन आणि व्हाईस चेअरमन या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर महिलांची बिनविरोध निवड झाली आहे. चेअरमनपदी सौ. प्रतिभा कैलास पाटील, तर व्हाईस चेअरमनपदी सौ. नलिनी अजय देशमुख यांची निवड झाल्याने गांधलीच्या सहकार क्षेत्रात महिला नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.

संस्थेचे मावळते चेअरमन दिनेश पवार आणि मावळते व्हाईस चेअरमन शांताराम माळी यांच्या कार्यकाळानंतर संस्थेची जबाबदारी आता महिला नेतृत्वाकडे सोपविण्यात आली आहे. दोन्ही पदांवर महिलांची बिनविरोध निवड होण्याची ही संस्थेच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे.

महिला सक्षमीकरणाला नवी दिशा

गांधली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या दोन्ही वरिष्ठ पदांवर महिलांची निवड झाल्याने गावासह सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी, सभासद आणि ग्रामस्थांचा विश्वास सार्थ ठरवत संस्थेचा कारभार अधिक पारदर्शक, प्रगतिशील आणि शेतकरीहिताचा करण्याचा संकल्प नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

निवडणुकीसाठी नेतेमंडळींचे सहकार्य

ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी सुनील पाटील, प्रवीण पाटील, महेश देशमुख, गजेंद्र साळुंखे, हिम्मत पाटील, बापुराव चव्हाण, अशोक महाजन, सीताराम भाऊ आणि आधार महाजन यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

निवडीनंतर जल्लोषात स्वागत

प्रतिभा पाटील आणि नलिनी देशमुख यांच्या निवडीची घोषणा होताच पेढे वाटून आणि फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे सर्व संचालक, सभासद, ग्रामस्थ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button