Crime

हृदयद्रावक : गणेशोत्सवाच्या धामधुमीत चिमुकल्यासह आईने घेतला टोकाचा निर्णय

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । देशभरात आज बाप्पाच्या आगमनाची धामधूम सुरू असतानाच जळगाव शहरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ५ वर्षीय चिमुकल्यासह आईने गळफास घेऊन जीवन संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील जुने जळगावच्या पुढे असलेल्या तळेले कॉलनीतील विघ्नहर्ता चौकाजवळ महाजन कुटुंबीय राहतात. निखील महाजन हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असून त्यांची सध्या नेमणूक राजस्थान येथे आहे. घराच्या तळमजल्यावर निखील महाजन हे तर भाऊ अक्षय महाजन हे पहिल्या माळ्यावर राहतात.

सोमवारी दुपारच्या सुमारास हेमांगिनी निखील महाजन वय-२८ या मुलगा शौर्य वय-५ याच्यासह घरात होत्या तर उर्वरीत कुटुंबीय वरील माळ्यावर होते. सायंकाळी निखील यांच्या आई खाली आल्या असता कुणीही दरवाजा उघडत नव्हते. त्यांना शंका आल्याने त्यांनी इतरांना कळवल्यावर घडलेला प्रकार लक्षात आला.

घटनास्थळी शनिपेठ पोलिसांनी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. महाजन कुटुंबीय संपूर्ण परिसरात परिचित आणि सर्वांशी मिळून मिसळून राहत असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button