

केन्द्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी श्री गणरायाची प्रतिष्ठापना
नवी दिल्ली | १४ सप्टेंबर २०२६
केंद्रीय युवा कामकाज आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांच्या दिल्ली येथील अधिकृत निवासस्थानी श्री गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर लाडक्या श्री गणरायाची अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली.
विधीवत पूजा आणि आरती करून विघ्नहर्त्या श्री गणेशाचे स्वागत करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी देशवासीयांना तसेच महाराष्ट्रातील नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. “श्री गणेशाच्या कृपेने देशात सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांतता लाभावी, तसेच युवा पिढीला क्रीडा व विविध क्षेत्रात नवे यश संपादन करण्याची प्रेरणा मिळावी,” अशी प्रार्थना त्यांनी याप्रसंगी केली.
या गणेशपूजनाच्या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्र्यांचे निकटवर्ती स्नेही आणि मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.







