भाजपा जिल्हा महानगर तर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंतीनिमित्त अभिवादन


भाजपा जिल्हा महानगर तर्फे कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंतीनिमित्त अभिवादन
जळगाव ;-भारतीय जनता पार्टी, जळगाव महानगरच्या वतीने खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जयंतीनिमित्त आज 24 ऑगस्ट रोजी बहिणाबाईंच्या पुतळ्याला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहराचे आमदार सुरेश भोळे-राजूमामा, भाजपा जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, यांच्या प्रमुख उपस्थितीत बहिणाबाईंच्या साहित्यिक योगदानाचे स्मरण करण्यात आले.
बहिणाबाईंच्या कार्यांचा उजळा देण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी मा अध्यक्षा उज्वला ताई बेंडाळे, प्रदेश सदस्य संतोष इंगळे, जिल्हा पदाधिकारी विशाल त्रिपाठी,राहुल वाघ,उदय भालेराव, राजेंद्र मराठे,दिपक परदेशी,सागर पाटील,सचिन बाविस्कर, विजय वानखेडे, प्रकाश पंडित, मयूर भदाणे, नगरसेवक वीरेंद्र खडके, विशाल भोळे, विजय बांदल,प्रदीप रोटे,मंडळ अध्यक्ष विनोद मराठे, चेतन तिवारी ,अनिल जोशी,हर्षल सिखवाल,उन्मेष चौधरी, प्रल्हाद सोनवणे,महेश चौधरी,प्रमोद वाणी,चेतना मुळीक,मयूर मुळीक,दिलीप लाडवंजारी,शिवा कळस्कर, लोकेश जोशी, रवी पददेशी,राजश्री शर्मा,राजश्री सोनवणे चंदू महाले , इ. उपस्थित होते.जळगावच्या मातीतून आपल्या प्रतिभावान लेखणीतून मराठी साहित्यविश्व समृद्ध करणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांचे साहित्य आणि विचार आजही समाजाला प्रेरणा देतात.







