शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार

शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखाली हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार
अमळनेर(प्रतिनिधी) : अमळनेर विधानसभा क्षेत्राचे माजी आ. शिरीष चौधरी यांच्या नेतृत्वाखालील हजारो कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत.हा भव्य प्रवेश सोहळा मंगळवार, दि. 14 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता मुंबईतील मुक्तागिरी बंगला, मलबार हिल येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, तसेच शिवसेनेचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि राज्यभरातील हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या पार्श्वभूमीवर अमळनेर व परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून, समर्थकांचे जत्थे मुंबईकडे रवाना होण्यास सुरुवात झाली आहे.
शिरीष दादा चौधरी यांच्या नेतृत्वाखालील हा पक्ष प्रवेश उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांवर परिणामकारक ठरणारा असून, शिवसेनेला नवचैतन्य व संघटनात्मक बळकटी मिळेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, प्रवेश सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर “जय महाराष्ट्र, जय शिवसेना”च्या घोषणांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.






