EducationSocial

आमदार एकनाथराव खडसेंच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय साहित्य वाटप

आमदार एकनाथराव खडसेंच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय साहित्य वाटप

जळगाव (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जळगाव महानगरच्या वतीने आमदार एकनाथराव खडसे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील १०० गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, दप्तर व वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष अशोकभाऊ लाडवंजारी यांच्या माध्यमातून करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजहरभाऊ पठाण होते. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विनायक पाटील, माजी नगरसेवक राजूभाऊ मोरे, माजी नगरसेवक सुनीलभाऊ माळी, माजी ओबीसी जिल्हाध्यक्ष नामदेव वाघ, जिल्हाध्यक्ष अशोकभाऊ लाडवंजारी, ओबीसी महानगर अध्यक्ष गिरीश सांगळे, श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे उपाध्यक्ष बाळाजी सानप, भगवान लाडवंजारी, संस्थेचे संचालक संतोषभाऊ चाटे, मुख्याध्यापक दिवाकर जोशी यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना शिक्षिका प्रतिभा पाटील यांनी केली. यावेळी मजहरभाऊ पठाण यांनी अध्यक्षीय भाषणातून एकनाथराव खडसे यांच्या राजकीय व सामाजिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व साहित्य वाटप करण्यात आल्याबद्दल अशोकभाऊ लाडवंजारी यांनी उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे नियोजन प्रतिभा पाटील व दिनेश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अतुल चाटे यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक दिवाकर जोशी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

दरम्यान, वाढदिवसानिमित्त शासकीय महाविद्यालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. तसेच शिवाजीनगर खडके जाळ परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विनायक पाटील यांच्या आयोजनातून वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button