Social

शिंपी समाजातील ज्ञानज्योती पुरस्काराचे सलग ३० वर्षे वितरण

शिंपी समाजातील ज्ञानज्योती पुरस्काराचे सलग ३० वर्षे वितरण

शिरसाठे परिवाराच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक साहित्याचेही वाटप

जळगाव, प्रतिनिधी : शिंपी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने शिरसाठे परिवाराच्या वतीने आयोजित ज्ञानज्योती पुरस्कार वितरण सोहळा यंदा सलग ३०व्या वर्षी उत्साहात पार पडला. १५ ऑगस्ट १९९६ पासून सुरू असलेल्या या उपक्रमातून दरवर्षी शिंपी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ज्ञानज्योती पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.

यंदाच्या कार्यक्रमात मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे चरित्र आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

जीवनज्योती उपक्रमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

‘जीवनज्योती’ या उपक्रमांतर्गत दरवर्षी एका नवीन शाळेची निवड करून त्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. कै. सुकलाल देवचंद सिरसाठे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यंदाही मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

गुणवंत विद्यार्थ्यांचा ज्ञानज्योती पुरस्काराने गौरव

कै. शांताराम सुकलाल सिरसाठे यांच्या स्मरणार्थ शिंपी समाजातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती स्मृतिचिन्ह आणि संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जीवनचरित्राची पुस्तिका देऊन सन्मानित करण्यात आले.

दहावीमध्ये उत्कर्ष योगेश नेरपगार (९४.६० टक्के), धनश्री योगेश शिंपी (८६.८० टक्के) आणि कोमल जितेश देवरे (६८.८० टक्के), तर बारावीमध्ये दिशा नितीन शिंपी (६६.८३ टक्के) यांचा गौरव करण्यात आला.

पदविका व पदवी स्तरावरही विद्यार्थ्यांचा सन्मान

डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल्समध्ये ऋचा सुजित जाधव (८४.३३ टक्के), बीई ईएनटीसीमध्ये निधी सुजित जाधव (९०.१३ टक्के) हिने महाविद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल, तर बी.आर्किटेक्चरमध्ये आकांक्षा अविनाश शिरसाठे (९०.९९ टक्के) हिचा गुणवत्तापूर्ण यशाबद्दल सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भावना पाटील, शारदा कॉलनी, महाबळ येथील शाळेच्या मुख्याध्यापिका शकुंतला टोके, प्रमुख पाहुण्या अभेद्या फाउंडेशनच्या संचालिका वैशाली झाल्टे, आशा फाउंडेशनच्या संचालिका सुजाता बोरकर, निकिता मॅडम तसेच आयोजक राकेश शिरसाठे, रश्मी शिरसाठे आणि मीना शिरसाठे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठीही मदतीचा हात

कै. रमाबाई सुकलाल शिरसाठे यांच्या स्मरणार्थ जिल्ह्यातील विविध भागांतून पुरस्कारासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना एकेरी प्रवासाचे भाडे आयोजकांच्या वतीने देण्यात येते. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला आधार देण्याचा हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.

मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात

कार्यक्रमाची सुरुवात माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक आयोजक राकेश शिरसाठे यांनी केले.

यावेळी आशा फाउंडेशनच्या संचालिका सुजाता बोरकर, अभेद्या फाउंडेशनच्या संचालिका वैशाली झाल्टे आणि पालक प्रतिनिधी म्हणून सुजित जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन रेवती राजहंस यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी योगदान

कार्यक्रमासाठी गौरव सिरसाठे आणि साक्षी सिरसाठे यांचे योगदान लाभले. तसेच अविनाश शिरसाठे, अमिषा शिरसाठे, मिलिंद सोनवणे, सुनील भावसार, सीमा पाटील, अजित पाटील, सुजित जाधव, नितीन शिंपी, जितेश देवरे, योगेश नेरपगार, घनश्याम (छोटू) नेवे आणि योगेश शिंपी यांचे अनमोल सहकार्य लाभले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणानाम् सत्संग परिवाराच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button