Social

उत्सवांसाठी वर्गणी संकलनास धर्मादाय विभागाची पूर्वपरवानगी आवश्यक

उत्सवांसाठी वर्गणी संकलनास धर्मादाय विभागाची पूर्वपरवानगी आवश्यक

जळगाव, सार्वजनिक उत्सव तसेच गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, शारदोत्सव इत्यादी उत्सवांच्या अनुषंगाने विविध सार्वजनिक उत्सव उपक्रम व कार्यक्रमांसाठी वर्गणी गोळा करण्याकरिता महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० चे कलम ४१-क अन्वये सहायक धर्मादाय आयुक्त, जळगाव यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.

जनतेच्या सोयीसाठी ही परवानगीची सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित मंडळांनी https://charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन युजर आयडी व पासवर्ड तयार करून ऑनलाइन अर्ज सादर करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन प्रती अपलोड करणे आवश्यक आहे.

अर्ज प्राप्त झाल्यानंतर सहायक धर्मादाय आयुक्त, जळगाव यांना योग्य वाटेल अशी चौकशी करून, विहित शर्तींच्या अधीन राहून वर्गणी अथवा देणगी संकलनास परवानगी देता येईल.

पूर्वपरवानगी न घेता वर्गणी अथवा देणगी गोळा केल्यास तसेच कायद्याचे उल्लंघन झाल्यास तक्रार प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. अधिक माहितीसाठी संबंधित मंडळांनी धर्मादाय विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे धर्मदाय आयुक्त यांनी कळविण्यात आले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button