तासिका तत्वावरील निदेशकांच्या नियुक्तीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन


तासिका तत्वावरील निदेशकांच्या नियुक्तीसाठी उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव, : कवयित्री बहिणाबाई चौधरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव येथे प्रवेश सत्र ऑगस्ट-२०२६ करिता विविध व्यवसायांमध्ये तासिका तत्वावरील निदेशकांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येणार आहे.
यासाठी शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्या व आवश्यक कागदपत्रांच्या मूळ व साक्षांकित प्रती तसेच अर्जासह दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता संस्थेत लेखी, प्रात्यक्षिक परीक्षा व मुलाखतीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहावे. उपस्थित उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा उपस्थिती भत्ता दिला जाणार नाही.
TDM (J&F), PPO, यांत्रिक डिझेल, यांत्रिक मोटारगाडी आणि फॉन्ड्रीमॅन या प्रत्येक व्यवसायासाठी एक पद उपलब्ध असल्याची माहिती प्राचार्य वाय. के. कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.







