Crime

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १४ जणांवर हद्दपारीची कारवाई

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १४ जणांवर हद्दपारीची कारवाई

जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांचा प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा; काहींना वर्षभर तर काहींना सहा महिन्यांसाठी हद्दपार

जळगाव, प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांकडून सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत सोमवार, ७ सप्टेंबर रोजी एकाच दिवसात १४ जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी संबंधित हद्दपारीचे आदेश काढले आहेत.

सहा महिन्यांपासून वर्षभरासाठी हद्दपार

हद्दपार करण्यात आलेल्या १४ जणांमध्ये नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील , जामनेरमधील , एमआयडीसीतील , तर रामानंदनगर, जिल्हापेठ आणि फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.

यातील काहींना एक वर्षासाठी, तर काहींना सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

एक वर्षासाठी हद्दपार

एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये अरमान चिंधा पटेल, अक्रम शहा सादीक शहा, हरी पांडुरंग पाटील, विपुल गोविंदा नाथ, आवेश खान उर्फ काल्या शेख जहांगिर, मुक्तार शेखा खलील शहा, आताल्लाह शाह अमानल्लाह शाह आणि चेतन उर्फ बटाट्या रमेश सुशीर यांचा समावेश आहे.

सहा महिन्यांसाठी हद्दपारी

तर जगन्नाथ रामकृष्ण कोळी, प्रकाश सुभाष शिंदे आणि सोपान अशोक इंगळे यांना सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यकतेनुसार पुढील प्रतिबंधात्मक कारवाईही केली जाणार आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button