Crime

पोषण आहाराच्या गोण्यांवर बसून प्रवास जीवावर बेतला; टायर फुटताच टेम्पो उलटला, दोघांचा मृत्यू

शेंदुर्णी-पहूर मार्गावर भीषण अपघात; वाहतूक व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

पोषण आहाराच्या गोण्यांवर बसून प्रवास जीवावर बेतला; टायर फुटताच टेम्पो उलटला, दोघांचा मृत्यू

शेंदुर्णी-पहूर मार्गावर भीषण अपघात; वाहतूक व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह

जळगाव l प्रतिनिधी  शालेय पोषण आहाराच्या गोण्यांवर बसून प्रवास करणाऱ्या दोन हमालांचा हा प्रवास अखेरचा ठरला. जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी-पहूर मार्गावर मंगळवारी दुपारी पोषण आहार वाहून नेणाऱ्या ४०७ टेम्पोचे अचानक टायर फुटले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो उलटला आणि गोण्यांवर बसलेले दोन्ही हमाल वाहनाबाहेर फेकले गेले. या दुर्घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

जगदीश लालचंद पाटील (रा. कृष्णापुरी, पाचोरा) आणि अर्जुन तुकाराम पाटील (रा. बहिरम नगर, पाचोरा) अशी मृतांची नावे आहेत.

पाचोरा येथून शालेय पोषण आहाराच्या गोण्या भरून हा टेम्पो पुढील वितरणासाठी निघाला होता. मालवाहू वाहनातून पोषण आहाराची वाहतूक सुरू असताना दोन हमाल गोण्यांवर बसले होते. शेंदुर्णी-पहूर मार्गावर अचानक टायर फुटल्याने वाहनाचा ताबा सुटला आणि काही क्षणांतच टेम्पो उलटला.

या घटनेने केवळ दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला नसून, शासकीय योजनेशी संबंधित पोषण आहाराच्या वाहतुकीच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पहूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button