EducationSport

चेस इन स्कूल्स’ साठी पहिली शाळा ठरली अनुभूती विद्या निकेतन

चेस इन स्कूल्स’ साठी पहिली शाळा ठरली अनुभूती विद्या निकेतन

ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिबळ कौशल्याने प्रभावित

जळगाव प्रतिनिधी : विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, तार्किक विचारशक्ती, विश्लेषण क्षमता, रणनीती आखण्याचे कौशल्य, योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित व्हावी, या उद्देशाने अनुभूती विद्या निकेतनमध्ये ‘चेस इन स्कूल्स’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा उपक्रम राबविणारी जळगावातील पहिली शाळा होण्याचा मान अनुभूती विद्या निकेतनने मिळविला आहे. या उपक्रमासाठी ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे उपस्थित होते. त्यांनी इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांचे बुद्धिबळातील कौशल्य पाहून विशेष आनंद व्यक्त केला. लहान वयातच विद्यार्थ्यांनी दाखविलेली समज, एकाग्रता आणि खेळातील चालींचे आकलन कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी बुद्धिबळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर दिला. बुद्धिबळामुळे मुलांमध्ये संयम, आत्मविश्वास, शिस्त आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित होत असल्याचे ते म्हणाले.

शाळेचे प्राचार्य मनोज परमार यांनी सांगितले की, अनुभूती विद्या निकेतनमध्ये खेळांना शिक्षणाचा अविभाज्य भाग मानले जाते. विद्यार्थ्यांना विविध खेळांचे नियम, तंत्र, रणनीती आणि नियमित सराव यांचे शिस्तबद्ध प्रशिक्षण दिले जाते. इनडोअर आणि आउटडोअर खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास घडविण्यावर शाळेचा भर आहे. खेळांमुळे आत्मविश्वास, जिद्द, संघभावना आणि खिलाडूवृत्ती विकसित होते. कार्यक्रमाला महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सचिव निरंजन गोडबोले, उपाध्यक्ष चिदंबर किटी भास्कर व राजेंद्र कोंडे, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार अरविंद देशपांडे, ‘चेस इन स्कूल्स’चे सचिव विलास म्हात्रे, रवींद्र धर्माधिकारी, बुद्धिबळ प्रशिक्षक प्रवीण ठाकरे आणि क्रीडा प्रशिक्षक स्मिता काटकर उपस्थित होते. अवनी जैन यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button