Other

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात

जळगाव | प्रतिनिधी

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री, स्वातंत्र्यलढ्यातील महान नेते आणि ‘लोहपुरुष’ म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. कविता शितलकुमार देशमुख यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी प्राचार्यांनी आपल्या मनोगतातून सरदार पटेल यांच्या जीवनकार्याचा, देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा तसेच स्वतंत्र भारताच्या एकीकरणासाठी त्यांनी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा परिचय करून दिला.

याप्रसंगी विद्यार्थिनींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित भाषणे सादर केली. त्यांच्या देशभक्ती, दृढनिश्चय, नेतृत्वगुण आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारांना उजाळा देत विद्यार्थिनींनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. अशा महापुरुषांच्या विचारांतून विद्यार्थिनींना देशप्रेम, सामाजिक एकता आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button