Other

गोदावरी नर्सिंगमध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त एकात्मता, बंधुता आणि अखंडतेचा संदेश

गोदावरी नर्सिंगमध्ये सरदार वल्लभभाई पटेल जयंती निमित्त एकात्मता, बंधुता आणि अखंडतेचा संदेश
जळगाव | प्रतिनिधी गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, जळगाव येथे भारताचे लोहपुरुष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिन म्हणून उत्साहात आणि आदरपूर्वक साजरी करण्यात आली.
यावेळी प्राचार्य विशाखा गणविर यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांच्या महान कार्याचे स्मरण करून देत. देशाच्या एकात्मतेसाठी, अखंडतेसाठी आणि राष्ट्रीय ऐक्यासाठी त्यांनी दिलेले योगदान विषद केले.राष्ट्रीय भारताची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

महाविद्यालयातील शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार आणि कार्य नव्या पिढीला सदैव प्रेरणा देणारे असून, त्यांच्या आदर्शांनुसार एकसंघ, सक्षम आणि मजबूत भारत घडविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button