Other

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
जळगाव : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथील प्राध्यापक डॉ. बापूराव बीटे यांनी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आयोजित वैद्यकीय शिक्षणातील प्रगत अभ्यासक्रम (एसीएमसी) हा प्रतिष्ठित अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला.हा अभ्यासक्रम मुंबई येथील सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज व केईएम रुग्णालय, परळ या राष्ट्रीय वैद्यकीय आयोगच्या नोडल सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता.
या प्रशिक्षणादरम्यान वैद्यकीय शिक्षणातील आधुनिक अध्यापन पद्धती, विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, मूल्यमापन तंत्र, अभ्यासक्रम नियोजन, प्रभावी अध्यापन कौशल्ये तसेच वैद्यकीय शिक्षणातील विविध नवकल्पनांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय पोस्टर सादरीकरणाच्या माध्यमातून सहभागी डॉक्टरांना आपले शैक्षणिक अनुभव व संशोधन मांडण्याची संधी मिळाली.या कार्यक्रमात डीन डॉ. अजय भांडारवार, डॉ. संतोष साळगरे, नोडल सेंटरचे समन्वयक डॉ. प्रवीण अय्यर, डॉ. राखी त्रिपाठी, डॉ. मुनीरा हिरकानी, डॉ. संतोष धोढी यांच्यासह अनुभवी प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. देशभरातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापकांनीही या प्रशिक्षणात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.प्रशिक्षणानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ. बापूराव बीटे यांनी सांगितले की, या अभ्यासक्रमामुळे वैद्यकीय शिक्षणातील नवीन अध्यापन तंत्र, नेतृत्व विकास आणि विद्यार्थ्यांना अधिक परिणामकारक शिक्षण देण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली. नेतृत्व शिकणे ही एक निरंतर प्रक्रिया आहे. या संकल्पनेनुसार सतत शिकत राहणे आणि शिक्षणात गुणवत्ता वाढविणे हेच या प्रशिक्षणाचे प्रमुख वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी नमूद केले.या यशाबद्दल डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सहकारी, प्राध्यापक आणि व्यवस्थापनाने डॉ. बापूराव बीटे यांचे अभिनंदन केले

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button