साखरपुड्याच्या आनंदावर काळाचा घाला; भरधाव कार, दुचाकी आणि एसटी बसची समोरासमोर धडक; सहा जण ठार
अमळनेर तालुक्यातील मंगरूळ गावाजवळील घटना

साखरपुड्याच्या आनंदावर काळाचा घाला; भरधाव कार, दुचाकी आणि एसटी बसची समोरासमोर धडक; सहा जण ठार
एक जण गंभीर ; अमळनेर तालुक्यातील मंगरूळ गावाजवळील घटना
पंकज शेटे I अमळनेर I महापोलीस न्यूज
अमळनेर – धुळे महामार्गावरील अमळनेर तालुक्यातील मंगरूळ गावाजवळ एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा तिहेरी अपघात घडला आहे. एसटी बस, बलेनो कार आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या या भीषण धडकेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला असून, १ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये गुजरात राज्यातील व्यारा येथील एकाच कुटुंबातील ४ जणांचा समावेश आहे. हे सर्वजण अमळनेर येथे एका साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी येत असताना त्यांच्यावर हा काळाने झडप घातली
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात पासिंगची सुझुकी स्विफ्ट कार (क्र. GJ 19 AF 3147), अमळनेर-चाळीसगाव एस.टी. बस (क्र. MH 13 CU 7540) आणि एक मोटारसायकल (क्र. MH 18 CD 8719) यांच्यात मंगरूळ गावाजवळ जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा आणि मोटरसायकलचा अक्षरशः चक्काचूर झाला. एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू तर 1 जणाला धुळे येथे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.
या अपघातात मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या खिशात सापडलेल्या कागदपत्रांवरून त्याचे नाव निलेश सुकदेव तावडे असल्याचे समोर आले असून, तो शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील रहिवासी असल्याचे समजते. मोटारसायकलवरील मृत महिला ही .फाल्गुनी एकनाथ भोई(मयत रा.धरणगाव ) असे आहे.
मृतांची नावे खालीलप्रमाणे
नंदलाल गोपाल महाजन (मयत, रा. व्यारा, गुजरात) निर्मला नंदलाल महाजन (मयत, रा. व्यारा, गुजरात) सुरेश विक्रम महाजन (मयत, रा. व्यारा, गुजरात) अनिता सुरेश महाजन* ( मयत, रा. व्यारा, गुजरात) निलेश सुकदेव तावडे(मयत रा. मालपूर तालुका शिंदखेडा) फाल्गुनी एकनाथ भोई(मयत रा.धरणगाव ) असे आहे.
या अपघातात कारमधील एक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींची नावे: आदित्य चंद्रकांत महाजन (जखमी रा.व्यारा, गुजरात)
११२ आपत्कालीन सेवा आणि पोलिसांची तत्परता लगेच घटनास्थळी धाव
अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे, रवी पाटील तसेच मंगरूळचे पोलीस पाटील भागवत पाटील यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ मदतकार्य सुरू केले.
जखमींना ‘१०८’ रुग्णवाहिकेद्वारे तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.
आनंदाच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या कुटुंबावर अचानक कोसळलेल्या या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या प्रसंगामुळे व्यारा आणि अमळनेर परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





