माजी सैनिक शिवदास शेटे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार


माजी सैनिक शिवदास शेटे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार
जळगाव येथे राष्ट्रीय मानवाधिकार भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशनतर्फे गौरव
अमळनेर, प्रतिनिधी : आजी-माजी सैनिक फाउंडेशन अमळनेरचे तालुका संघटक तथा माजी सैनिक शिवदास नामदेव शेटे यांना राष्ट्रीय मानवाधिकार भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय फाउंडेशन (गव्हर्मेंट ऑफ इंडिया) यांच्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जळगाव येथे ४ ऑक्टोबर रोजी संस्थेतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते शिवदास शेटे यांना स्मृतिचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र प्रदान करून त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला.
शिवदास शेटे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल आजी-माजी सैनिक फाउंडेशन अमळनेर तसेच समस्त वैश्य वाणी समाजाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.






