EducationSport

राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत आकांक्षा म्हेत्रेला कांस्यपदक

राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत आकांक्षा म्हेत्रेला कांस्यपदक

एलिट वुमन टीम स्प्रिंटमध्ये दमदार कामगिरी; ३९ व्या नॅशनल गेम्ससाठी महाराष्ट्र संघात निवड

जळगाव, (प्रतिनिधी) : रांची (झारखंड) येथे झालेल्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आकांक्षा म्हेत्रे हिने उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. एलिट वुमन टीम स्प्रिंट या प्रकारात १ मिनिट १२.६२० सेकंदांची वेळ नोंदवत तिने पदकाला गवसणी घातली. आकांक्षा ही जैन इरिगेशनचे जी. एम. म्हेत्रे यांची कन्या आहे.

सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि झारखंड सायकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरदरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत १० राज्यांच्या संघांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी आठ संघांनी पात्रता फेरी पार करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत रेल्वे सर्व्हिसेस संघाने १ मिनिट ९.९६६ सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले, तर झारखंड संघाने १ मिनिट १२.२५१ सेकंदांची वेळ नोंदवली. महाराष्ट्राच्या आकांक्षाने १ मिनिट १२.६२० सेकंदांची वेळ नोंदवत कांस्यपदक मिळवले.

वैयक्तिक एक किलोमीटर टाइम ट्रायल प्रकारातही आकांक्षाने लक्षवेधी कामगिरी केली. पहिल्याच प्रयत्नात १ मिनिट १८.०१ सेकंदांची वेळ नोंदवत तिने अव्वल सहा खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. या कामगिरीच्या जोरावर मेघालय येथे होणाऱ्या ३९ व्या नॅशनल गेम्समध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी तिला मिळाली आहे.

दरम्यान, १८ ते २१ नोव्हेंबरदरम्यान अमृतसर येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ ट्रॅक सायकलिंग स्पर्धेसाठी आकांक्षा सध्या बालेवाडी येथे कसून सराव करत आहे. राष्ट्रीय स्तरावरील या यशामुळे तिच्या क्रीडा कारकिर्दीला नवी दिशा मिळाली असून, तिच्या कामगिरीचे जळगावच्या क्रीडावर्तुळातून कौतुक होत आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button