Social

महानगरपालिकेच्या वाहन विभागाचा उपमहापौरांकडून आढावा; बंद व नादुरुस्त वाहने तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश!

महानगरपालिकेच्या वाहन विभागाचा उपमहापौरांकडून आढावा; बंद व नादुरुस्त वाहने तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश!

जळगाव, प्रतिनिधी: जळगाव शहर महानगरपालिकेच्या वाहन विभागाचा आज दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी मा. उपमहापौर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. या बैठकीस संदीप मोरे (वाहन विभाग प्रमुख), निर्मला गायकवाळ (उपायुक्त,वाहन विभाग), अश्वजित घरडे (अग्निशमन विभाग प्रमुख) व भरत बारी(अग्निशमन विभाग), पंकज गोसावी (उपायुक्त ,अग्निशमन विभाग) व संजय राऊत (सहाय्यक आयुक्त) यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान महानगरपालिकेच्या एकूण वाहनांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला असता, अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण वाहनांपैकी ४ वाहने (जे.सी.बी, रुग्न वाहीका, पोकलेन इ.) बंद अवस्थेत असून, काही वाहनांना किरकोळ व मोठ्या स्वरूपाच्या दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले.

यावेळी मा. उपमहापौर यांनी बंद पडलेली वाहने तसेच अग्निशमन विभागासह अत्यावश्यक सेवांमध्ये वापरली जाणारी वाहने प्राधान्याने व तातडीने दुरुस्त करून कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच वाहनांच्या देखभाल व दुरुस्ती प्रक्रियेत काही त्रुटी किंवा अडचणी असल्यास त्यांची त्वरित दखल घेऊन सुधारणा करावी, वाहनांची नियमित तपासणी व देखभाल करावी, असे स्पष्ट निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

महानगरपालिकेची वाहने ही शहरातील दैनंदिन नागरी सेवा, स्वच्छता, आरोग्य व आपत्कालीन सेवांसाठी अत्यंत महत्त्वाची असून, कोणतेही वाहन केवळ दुरुस्तीअभावी बंद राहणार नाही, याची दक्षता संबंधित विभागाने घ्यावी. नागरिकांना मिळणाऱ्या अत्यावश्यक सेवांमध्ये वाहनांच्या अभावामुळे कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी वाहन विभागाने कार्यक्षमतेने काम करावे, असे निर्देश मा. उपमहापौर यांनी यावेळी दिले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button