अमळनेर वैश्यवाणी (शेटे) समाजातर्फे गुणवंतांचा गौरव; ९० हून अधिक विद्यार्थ्यांचा सन्मान
इंदिरा भवन येथे उत्साहात पार पडला गुणगौरव सोहळा; मान्यवरांचे मार्गदर्शन, शैक्षणिक साहित्याचे वाटप

महा पोलीस न्यूज । पंकज शेटे । अमळनेर वैश्यवाणी (शेटे) समाज मंडळातर्फे १२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शहरातील इंदिरा भवन येथे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी खान्देशातील ९० हून अधिक गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करताना मान्यवरांनी सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त आणि योग्य ध्येय निश्चितीच्या माध्यमातून जीवनात मोठे यश संपादन करण्याचा संदेश दिला.
सोहळ्यात शिवाजी रामदास भदाणे (अमळनेर), चोपडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजीव शेटे, नाशिक येथील अध्यक्ष गजानन दलाल, सेवानिवृत्त सैनिक शिवदास शेटे, चहार्डी येथील प्रगतशील शेतकरी राजेश शेटे यांनी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले. बदलत्या काळात कौशल्याधारित शिक्षण, स्पर्धा परीक्षा, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि सामाजिक मूल्यांचे महत्त्व यावर त्यांनी सविस्तर विचार मांडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश शेटे आणि जान्हवी सोनवणे यांनी प्रभावीपणे केले. अध्यक्ष किरण तायडे आणि संजय शेटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सोहळ्यानंतर शेटे बंधू केटर्सचे संचालक राजेंद्र शेटे, सुनील शेटे, किरण शेटे यांच्या वतीने उपस्थितांसाठी स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमळनेर वैश्यवाणी (शेटे) समाज मंडळाचे अध्यक्ष किरण तायडे, उपाध्यक्ष योगेश शेटे, कार्याध्यक्ष संजय शेटे, सचिव पंकज शेटे, खजिनदार गिरीश शेटे, संघटक राकेश शेटे, सल्लागार शिवाजी भदाणे, बळीराम वाणी, शिवदास शेटे, राजेंद्र देसले तसेच मंडळाच्या माजी अध्यक्ष पुरुषोत्तम शेटे तसेच अविनाश शेटे , धिरज शेटे, शुभम शेटे, निखिल शेटे, मयुर शेटे, साहिल शेटे, दर्शन शेटे यांचे अनमोल सहकार्य लाभले तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.





