Crime

दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक ; आठ मोटरसायकली जप्त 

दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना अटक ; आठ मोटरसायकली जप्त 

यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

यवतमाळ – जिल्ह्यात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विशेष मोहीम राबवत दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, एकूण २.४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक पियुष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. १२ मार्च २०२५ रोजी गुन्हे शाखा व घाटंजी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दोन इसम चोरीच्या वाहनांसह घाटंजी शहरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी वाहनचोरीच्या घटनांची कबुली दिली.

तपासादरम्यान, त्यांच्याकडून विविध ठिकाणांहून चोरलेल्या ८ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या वाहनचोरीप्रकरणी यवतमाळ व परिसरातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास सुरू असून, अजूनही काही चोरीच्या गाड्या हस्तगत होण्याची शक्यता आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिता व अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप, यांचे मार्गदर्शनात उपविभागिय पोलीस अधिकारी पांढरकवडा रामेश्वर वेजने, पोलीस निरीक्षक सतिष चवरे स्थागुशा, पो.नि. निलेश सुरडकर पो.स्टे घांटजी, सपोनि अजय कुमार वाढवे, पोहवा सुनिल खंडागळे, उल्हास कुरकुटे, सुधिर पांडे नापोका सुधिर पिदुरकर, निलेश निमकर, पोशी सलमान शेख, रजनिकांत मडावी सर्व स्थागुशा यवतमाळ पोलीस स्टेशन घांटजी येथील पोहवा राहुल खडागळे, मुकेश करपते, अंकुश वहाळे, पोका छेदक मनवर, नितेश छापेकर यांचे पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button