जामदा कालवा फुटला; नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित!
पंचनामे होऊनही भरपाईच्या यादीतून नावे गायब असल्याचा आरोप; आठ दिवसांत कारवाई न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा


जामदा कालवा फुटला; नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित!
पंचनामे होऊनही भरपाईच्या यादीतून नावे गायब असल्याचा आरोप; आठ दिवसांत कारवाई न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा
भडगाव (प्रतिनिधी) दि. ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या ढगफुटीसदृश म सळधार पावसामुळे आणि शिवणी येथील जामदा कालवा फुटल्याने भडगाव तालुक्यातील वडजी सजेअंतर्गत येणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मात्र,महसूल विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आणि वडजी सजेच्या तलाठी सौ. वैशाली वाघ यांच्या अकार्यक्षमतेमुळे खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही कोणतीही शासकीय मदत मिळालेली नाही. या अन्यायाविरोधात अखिल भारतीय मराठा महासंघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रदीप पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनीभडगाव तहसीलदारांना निवेदन देऊन आठ दिवसांत कारवाई न झाल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला आहे
. कालवा फुटल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. प्रशासनाकडून पिकांचे पंचनाम ही करण्यात आले. मात्र, नुकसानभरपाईची शासकीय यादी जाहीर झाल्यानंतर धक्कादायक प्रकार समोरआला आहे. वडजी सजेच्या तलाठ्यांनी खरीप पेरणी केलेल्या व प्रत्यक्ष नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळली असून, ज्यांचे नुकसान झाले नाही, अशा इतर लोकांची नावे यादीत समाविष्ट केल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तलाठ्यांच्या अशा मनमानीजामदा कालवा फुटल्याने आणि चुकीच्या कारभारामुळे शेतकरी हक्काच्या नुकसानभरपाईपासून वंचित राहिल्याचे निवेदनात म्हटले आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वडजी सजेच्या तलाठी वैशाली वाघ या कर्तव्यात कसूर करत असून अत्यंत अकार्यक्षम आहेत. त्यांच्या या भ्रष्ट व चुकीच्या कामाची वरिष्ठ पातळीवरून तात्काळ सखोल चौकशी करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून आठ दिवसांच्या आत कडक कारवाई न झाल्यास वडजी सजेतील सर्व नुकसानग्रस्त शेतकरी व अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पाठिंब्याने भडगाव तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर जिल्हा सरचिटणीस जगदीश शिंदे, जिल्हा संघटक योगेश पाटील, शेतकरी बाबाजी भावराव पाटील, विजय पाटील, रावसाहेब पाटील, सचिन पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आंदोलनाच्या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पुढील कारवाईसाठी देण्यात आल्या आहेत.







