Politics

भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या तिरंगा यात्रेच्या नियोजनासाठी जळगावात बैठक

भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या तिरंगा यात्रेच्या नियोजनासाठी जळगावात बैठक 

जळगाव : भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा, जळगाव महानगरच्या वतीने मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली १४ ऑगस्ट २०२६ रोजी संभाजीनगर (औरंगाबाद) येथे आयोजित तिरंगा यात्रेच्या नियोजनासाठी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

मंत्री गिरीश महाजन, आमदार राजू मामा भोळे आणि जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाध्यक्ष परवेज खान पठाण यांच्या अध्यक्षतेखाली पद्मालय विश्रामगृह, जळगाव येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले.

बैठकीत तिरंगा यात्रेत अल्पसंख्याक समाजातील युवक, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याबाबत सविस्तर नियोजन करण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य जहांगीर खान यांनी अल्पसंख्याक समाजातील युवकांनी मोठ्या संख्येने तिरंगा यात्रेत सहभागी होऊन राष्ट्रभक्तीचा संदेश देण्याचे आवाहन केले. तसेच जिल्हा उपाध्यक्ष वसीम खान यांनी जळगाव जिल्ह्यातून जास्तीत जास्त नागरिकांना सोबत घेऊन यात्रेत सहभागी होण्याचे आश्वासन दिले.

बैठकीस वसीम खान, जहांगीर खान, इरफान शेख, अफसर शेख, इस्माईल शेख, अब्दुल हमीद शेख, कादर खान, रेहान पिंजारी, इद्रिस शेख, सलमान खान, शाकीर खान, मुस्ताक बागवान, अखलाक शेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या उपक्रमाला भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर अल्पसंख्याक सहयोगी संघटनांचेही सहकार्य लाभणार आहे. यामध्ये वाहतूक संघटना संयुक्त महासंघ महाराष्ट्र राज्य (जळगाव जिल्हाध्यक्ष तनवीर खान), जळगाव जिल्हा बिल्डिंग पेंटर वेल्फेअर असोसिएशन तसेच राष्ट्रीय मुस्लिम सेना (मुजाहिद शेख) यांचा सहभाग राहणार आहे.

तिरंगा यात्रेची माहिती

दिनांक : १४ ऑगस्ट २०२६, शुक्रवार
वेळ : सकाळी ८.०० वाजता
स्थळ : पद्मालय विश्रामगृह, जळगाव

तिरंगा यात्रेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :
जिल्हा उपाध्यक्ष वसीम खान — 9764000907

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button