Politics

भाजपा उत्तर महाराष्ट्र ‘विभागीय कार्यालय प्रमुख’ पदी शिवम शिंपी यांची निवड

भाजपा उत्तर महाराष्ट्र ‘विभागीय कार्यालय प्रमुख’ पदी शिवम शिंपी यांची निवड

जळगाव / नाशिक (प्रतिनिधी):
भारतीय जनता पार्टीच्या उत्तर महाराष्ट्र ‘विभागीय कार्यालय प्रमुख’ पदी नाशिक येथील सक्रिय कार्यकर्ते श्री. शिवम शिंपी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिकृत पत्र देऊन या निवडीची घोषणा केली आहे. एका अभ्यासू, मेहनत घेणाऱ्या आणि सामान्य कार्यकर्त्याच्या संघटनात्मक कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी हे महत्त्वपूर्ण दायित्व सोपवल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

नगरदेवळा ते उत्तर महाराष्ट्र समन्वयक एक समर्पित प्रवास
शिवम शिंपी हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील नगरदेवळा येथील रहिवासी आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण नगरदेवळा या गावात झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्यांनी जळगाव येथील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीनिमित्त ते नाशिक येथे स्थायिक झाले.

नाशिक येथे आल्यानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये अत्यंत प्रभावी व उल्लेखनीय कामगिरी बजावली.पक्षाचे कार्यालयीन व्यवस्थापन, विविध कार्यक्रम, उपक्रम, अभियानांचे यशस्वी नियोजन व त्याचे वस्तुनिष्ठ रिपोर्टिंग करण्यात त्यांचा मोठा हातखंडा राहिला आहे. गेली ६ वर्षे त्यांनी उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक म्हणून अत्यंत सक्षमपणे जबाबदारी पेलली आहे.निवडणुकीतील सक्रिय नियोजन आणि पक्षश्रेष्ठींचा विश्वास लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी नियोजनबद्ध काम करत पक्षाच्या विजयात आणि संघटनात्मक बांधणीत मोलाचा वाटा उचलला आहे. सर्व लोकप्रतिनिधी, पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि सामान्य कार्यकर्ते यांच्याशी त्यांचा थेट संपर्क, संवाद आणि मनमिळाऊ स्वभाव यामुळे ते सर्वांचे अत्यंत विश्वासू मानले जातात.

पदापेक्षा जबाबदारी मोठी’ – शिवम शिंपी
आपल्या या नियुक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना शिवम शिंपी म्हणाले, “हे पद नसून पक्षाने माझ्यावर टाकलेली मोठी जबाबदारी आहे. पक्षश्रेष्ठींनी एका सामान्य कार्यकर्त्याच्या निष्ठेचा व मेहनतीचा केलेला हा सन्मान आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांना पक्षाच्या कामकाजाची माहिती वेळेवर देणे, त्यांच्या अडीअडचणी व सुख-दुःख जाणून घेणे आणि सर्व विषयांचा अहवाल नेहमी अपडेट ठेवणे ही माझी मुख्य प्राथमिकता असेल. माझी निवड केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी जी फडणवीस साहेब , भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र जी चव्हाण साहेब , सर्व प्रदेश महामंत्री, संघटनमंत्री, कार्यालय मंत्री आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्व सन्माननीय मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा व मंडळ अध्यक्ष तसेच महामंत्र्यांचे मनापासून आभार मानतो.”

शिवम शिंपी यांच्या या निवडीबद्दल उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी, लोकप्रतिनिधींनी,पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button