Other

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम 

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम 

बालकांना पोलिओ डोस देण्याचे आ.राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

जळगाव : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान २०२६ अंतर्गत, जळगाव शहर महानगरपालिकेच्या दवाखाना विभागातर्फे रविवारी (२८ जून) शहरात पल्स पोलिओ मोहिमेची उत्साहात सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला धन्वंतरी देवतेचे पूजन करून मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. आमदार राजूमामा भोळे आणि महापौर दीपमाला काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लहान बालकांना पोलिओ डोस देऊन या मोहिमेचा श्रीगणेशा करण्यात आला.

आमदार राजूमामा भोळे यांनी, “बाळ आणि बाळंत माता यांच्या आरोग्यासाठी डॉक्टरांनी विशेष काळजी घेतली पाहिजे,” असे प्रतिपादन या प्रसंगी केले. महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले की, जळगाव शहरातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील सर्व बालकांच्या पालकांनी आपल्या मुलांना पोलिओ डोस देऊन, त्यांना भविष्यातील संभाव्य अपंगत्वापासून (पोलिओ) वाचवावे, असे आवाहन केले. तसेच ३० जूनपासून शहरात घरोघरी जाऊन हे लसीकरण केले जाईल. त्यावेळी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे अशी माहितीही त्यांनी दिली.

या प्रसंगी उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, आरोग्य विभागाचे उपसंचालक दिलीप सौंदळे आणि नगरसेवक दीपक सूर्यवंशी उपस्थित होते. तसेच वैद्यकीय व आरोग्य यंत्रणेतील राष्ट्रीय हिवताप अभियानाचे अधिकारी के. बी. नगराळे, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ, डॉ. राम रावलानी, डॉ. स्वप्नील सोनवणे आणि इन्चार्ज परिचारिका प्रिया सूर्यवंशी यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button