जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..
मकरा चॅलेंजर्स, आप्पासाहेब लिजेंड्स, साईनाथ टायटन्स, लीजर स्पोर्ट्स स्टार्स संघांची विजयी सुरवात
जळगाव प्रतिनिधी – जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे विद्यमाने आयोजित व जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड पुरस्कृत जळगाव कॅरम लीग- पर्व २ ही स्पर्धची शानदार सुरवात झाली.पहिल्या सामन्यांमध्ये मकरा चॅलेंजर्स, आप्पासाहेब लिजेंड्स, साईनाथ टायटन्स, लीजर स्पोर्टस स्टार्स संघांनी विजयी सुरवात केली आहे. आजपासून सुरू झालेल्या स्पर्धा २८ जून पर्यंत कांताई सभागृह येथे होईल. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार सुरेश भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत यूसुफभाई मकरा, अरविंद देशपांडे, अॅड. रविंद्र कुलकर्णी, मंजूर खान, रंगनाथ पाटील, आरीश शेख, आमीर शेख, रेहान सालार, आसीफ खान,अशफाक शेख यांच्यासह आयोजन समितीचे प्रमुख सय्यद मोहसीन, हमिद भुसावली, रविंद्र धर्माधिकारी, हबीब शेख, फजल मोहम्मद, फिरोज खान, शेख अजीज, अताउल्लाह खान यांची उपस्थीती होती.
आठ संघामध्ये होणाऱ्या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट असे ४८ व महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यांमधील जैन इरिगेशनचे व महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केलेले ८ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विजेते खेळाडूंनी सहभाग घेतला. ही स्पर्धा प्रथम लीग पद्धतीने व नंतर बाद पद्धतीने खेळविली जात आहे. स्पर्धेत पहिल्या चार क्रमांकाच्या संघांना रोख पारितोषिके आणि चषक अशा एकूण ६५ हजारांचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल. त्याचप्रमाणे स्पर्धेतील सहभागी सर्व खेळाडूंना मेडल सुद्धा दिली जाईल. स्पर्धा सिस्का कंपनीच्या बुलेट शॉट ह्या कॅरम बोर्ड व सोंगट्यांसह खेळविण्यात येत आहे. गणेश लोडते यांनी सुत्रसंचालन केले. जळगाव जिल्ह्यातील सर्व कॅरम व क्रीडाप्रेमींनी सदर स्पर्धेत येऊन कॅरमचा आनंद घ्यावा, असे आवाहन जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम कोगटा, सरकार्यवाह नितीन बरडे यांच्यासह आयोजकांनी केले आहे. पहिल्या फेरीमध्ये आप्पासाहेब लिजेंडस संघाने सालार किंग्ज संघाचा २-१, मकरा चॅलेंजर्स संघाने अरिश लॉयन्स संघाचा ३-० ने, साईनाथ टायटन्स संघाने स्पोर्ट हाऊस स्ट्रायकर संघाच २-१ ने आणि लिजर स्पोर्ट स्टार्स संघाने श्रीउत्तम हर्बल रायडर्स संघाचा ३-० ने पराभव करुन विजयी सुरवात केली.






