पिंपळवाड म्हाळसा गावात कृषीदूतांनी रचला सेंद्रिय खतांचा पाया!

पिंपळवाड म्हाळसा गावात कृषीदूतांनी रचला सेंद्रिय खतांचा पाया!
पिंपळवाड म्हाळसा, ता. चाळीसगाव :
चाळीसगाव तालुक्यातील पिंपळवाड म्हाळसा या गावात ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव (RAWE) योजनेअंतर्गत कृषी महाविद्यालय धुळे येथील अंतिम वर्षातील विद्यार्थी कृषीदूत म्हणून गावात दाखल झाले. त्यांच्या आगमनाने गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कृषीदूतांनी गावाचे सर्वेक्षण करून एक अभिनव उपक्रम राबवित सेंद्रिय खतांचा पाया उभारला. या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये रासायनिक खर्चाचा बोजा कमी होत असून ,गावकऱ्यांकडून विशेष उत्सुकता निर्माण झाली.
या उपक्रमांतर्गत कृषीदूत शेतकऱ्यांना माती व पाणी परीक्षण, योग्य पीक निवड, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, तसेच किड व रोग व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यासाठी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बी. एम. इल्हे, कार्यक्रम समन्वयक डॉ. जे. एच. गायकवाड, केंद्र प्रमुख डॉ. विक्रांत भालेराव, अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. विकास पवार तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रसाद मरगळ यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
कृषीदूत म्हणून सौरव जेऊघाले, अनिकेत गोसावी, तेजस भुजबळ, श्रेयस आगवणे, प्रसाद कदम आणि शेखर बोरसे या विद्यार्थ्यांनी गावात प्रवेश करताच शेतकऱ्यांशी संवाद साधून माहिती घेतली व संपूर्ण गावाचे सर्वेक्षण केले. गावात वेगवेगळे नवनवीन उपक्रम आपल्या गावात रुजवत आहे.
या कार्यक्रमास गावाचे सरपंच, पोलिस पाटील,कृषिसहायक अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागात कृषी शिक्षण व तांत्रिक ज्ञान पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक समृद्ध करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.






