Other

खान्देश, विदर्भ,संभाजीनगरात ६१,२२९ मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा ऐतिहासिक टप्पा

ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयाच्या मोतीबिंदू निर्मूलन अभियानाला अभूतपूर्व यश

खान्देश, विदर्भ,संभाजीनगरात ६१,२२९ मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा ऐतिहासिक टप्पा

ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयाच्या मोतीबिंदू निर्मूलन अभियानाला अभूतपूर्व यश

जळगाव : गोदावरी फाउंडेशन डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय संचलित ह.भ.प जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयाने खान्देश, विदर्भ आणि संभाजीनगर विभागात राबविलेल्या मोतीबिंदू निर्मूलन अभियानाने एक ऐतिहासिक टप्पा गाठला असून, सन २००८ ते २०२६ या कालावधीत तब्बल ६१ हजार २२९ मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. या शिबिरांमधून गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांची निवड करून त्यांच्यावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
मोतीबिंदू निर्मूलन अभियानाच्या यशामध्ये डॉ. एन एस आर्विकर,डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली मोतीबिंदू मुक्त शिबिराचे समन्वय डॉ. नि. तु. पाटील, डॉ. रेणुका पाटील, डॉ. मयुरी निलावड, डॉ. निखिल चौधरी, डॉ. संकेत पाटील, डॉ. नेहा नारखेडे, डॉ. शुभम भारसाकळे, डॉ. जतिन बाविस्कर, डॉ. उर्मी गायकवाड, डॉ. अनिष कांदळगावकर, डॉ. अभिजीत काकड, डॉ. दिव्या पोखरणकर, डॉ. मुग्धा बिचकर, डॉ. किर्ती महाजन, डॉ. ऋतुजा चव्हाण, डॉ. रिया गोरे, डॉ. गौरव पाटील, डॉ. वैष्णव व्यवहारे आणि डॉ. अश्विनी काकडे तसेच सबा शेख, प्रतिक्षा सुटे, तृप्ती भोयरकर, स्वाती खरे, खुशी कांबळे आणि संजय महाजन यांनीही महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे हे अभियान ग्रामीण व दुर्गम भागांपर्यंत प्रभावीपणे पोहोचले.याप्रसंगी डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले की ह.भ.प जगन्नाथ महाराज अंजाळेकर आणि दिवंगत श्रीमती गोदावरी आजी यांच्या सेवाभाव, करुणा आणि समाजाप्रती असलेल्या समर्पणातूनच या अभियानाला प्रेरणा मिळाली. त्यांचे आशीर्वाद आणि संस्कार हेच या जनसेवेचे खरे बळ असून, भविष्यातही एकही गरजू रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी हे अभियान अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहील.

पहाटे ५ वाजेपासून शस्त्रक्रियांना प्रारंभ करून शिबिराच्या गावी जाणारे आमचे डॉक्टर आणि त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे.
“मोतीबिंदू शस्त्रक्रियांची वर्षनिहाय आकडेवारी २००८ ते २०११ : ८,२१३ शस्त्रक्रिया २०१२ ते २०२६ : ५३,०१६ शस्त्रक्रियाएकूण : ६१,२२९
यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया ग्रामीण आणि वंचित घटकांपर्यंत गुणवत्तापूर्ण नेत्रोपचार पोहोचविण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले हे अभियान आज संपूर्ण उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यासाठी आशेचा किरण ठरले असून, हजारो रुग्णांच्या जीवनात नव्या प्रकाशाची पहाट घेऊन आले आहे.

मनाचा निश्चय केला की सर्व काही सोपे होते याची प्रचिती ह.भ.प जगन्नाथ महाराज अंजाळेकर आणि अभियानाच्या निमीत्ताने आली. पहाटे ५ वा शस्त्रक्रियेस सूरूवात केली जाते.सकाळी ९च्या सुमारास आमचे डॉ. शिबिराच्या गावी जावून दु. २ वाजेपर्यंत तपासणी करण्यात येते. रूग्णांना दृष्टी देण्यात एक वेगळा आनंद मिळत आहे .
– डॉ. नितू पाटील समन्यवक,मोतीबिंदू शिबिर

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button