राष्ट्रीय जनमंच पक्षाची चाळीसगावात तालुकास्तरीय बैठक; नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
संघटन विस्तार, स्थानिक प्रश्नांवर संघर्ष आणि आगामी निवडणुकांच्या तयारीवर भर


राष्ट्रीय जनमंच पक्षाची चाळीसगावात तालुकास्तरीय बैठक; नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
संघटन विस्तार, स्थानिक प्रश्नांवर संघर्ष आणि आगामी निवडणुकांच्या तयारीवर भर
चाळीसगाव : येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रीय जनमंच पक्षाची तालुकास्तरीय बैठक उत्साहात पार पडली. बैठकीत स्थानिक ज्वलंत प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविणे, सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करणे तसेच पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप लांडगे यांनी राष्ट्रीय जनमंच पक्षाचे विचार आणि धोरणे घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे, तसेच संघटन बळकट करून पक्षाचा विस्तार करण्यासाठी प्रयत्न वाढवावेत, असे आवाहन केले.
महाराष्ट्र प्रदेश संघटक देविदास आर. वाघ यांनी चाळीसगाव तालुक्यात गावोगावी पक्षाच्या शाखांचे उद्घाटन करून संघटन वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले. तर जळगाव जिल्हाध्यक्ष देविदास हटकर यांनी कार्यकर्त्यांची संख्या आणि सभासद नोंदणी वाढविण्यावर भर देत आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागण्याचे आवाहन केले.
संघटन विस्ताराच्या दृष्टीने बैठकीत पक्षाच्या विविध पदांवर पुढील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष – गणेश नारायण राठोड चाळीसगाव तालुका संघटक – रवींद्र बळीराम महाजन (मेहुणबारे) पाचोरा तालुका अध्यक्ष – मजीद पिंजारी (नगरदेवळा) नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे विचार व धोरणे तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवून संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि पक्षविस्तारासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याची ग्वाही दिली.
बैठकीच्या शेवटी चाळीसगाव तालुकाध्यक्ष सुरेश वेळीस यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी कामगार आघाडीचे चाळीसगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील, भालेराव पाटील, दिव्यांग आघाडी प्रमुख महेंद्र बागुल, शहर सचिव सचिन शेटे, राजेंद्र केदार, प्रशांत विठ्ठल कदम, तमीज बेग, गौरव पवार, शामकांत गुजर, गणेश मच्छिंद्र कुमावत यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







