चोपडा येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रथम वर्ष विद्यार्थी इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

चोपडा येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रथम वर्ष विद्यार्थी इंडक्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न
चोपडा, : महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती शरच्चंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक), चोपडा येथे प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात ज्ञानदेवता श्री सरस्वती देवी, कै. अक्कासाहेब, संस्थापक अध्यक्ष कै. दादासाहेब तसेच भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे माननीय अध्यक्ष मा. भैय्यासाहेब अॅड. संदीप सुरेश पाटील होते. यावेळी संस्थेच्या सचिव मा. ताईसाहेब डॉ. स्मिता संदीप पाटील प्रमुख उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय तंत्रनिकेतन, जळगावचे माजी प्राचार्य मा. पराग पाटील सर, वन परिक्षेत्र अधिकारी मा. बी. डी. कुवर साहेब, मुख्याध्यापक मा. मोहन चव्हाण सर, मा. अशोक कदम सर, वनपाल मा. वैशाली मोरे मॅडम व मा. आरती मोरे मॅडम उपस्थित होते. यावेळी पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच संगणक विभागातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी कुन्जेश नितीन शहा याचा शैक्षणिक यशाबद्दल विशेष गौरव करण्यात आला. यावेळी इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९६.८०% गुण मिळविणाऱ्या विद्यार्थिनी रिया सुनील जैन व तिच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
प्रमुख पाहुणे मा. पराग पाटील सर यांनी तांत्रिक शिक्षण व कौशल्यविकासाचे महत्त्व विशद केले. मा. बी. डी. कुवर साहेब यांनी शिस्त, आरोग्य व स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन केले. मा. मोहन चव्हाण सर, मा. अशोक कदम सर यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रमाच्या बळावर यश संपादन करण्याचे आवाहन केले, पालक प्रतिनिधी श्री. सुनील मोतीलाल जैन, तसेच स्थापत्य विभागप्रमुख प्रा. एन. आर. शिंदे व विद्युत विभागप्रमुख प्रा. कमलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधली. महाविद्यालयाचे प्राचार्य मा. व्ही. एन. बोरसे यांनी नियमित अभ्यास, उपस्थिती व कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
अध्यक्षीय भाषणात मा. भैय्यासाहेब अॅड. संदीप सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांनी तांत्रिक शिक्षणाबरोबरच संस्कार, शिस्त व नैतिक मूल्ये जोपासून सक्षम नागरिक बनावे, असे प्रतिपादन केले.
यावेळी उपप्राचार्य, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धनराज आर. पाटील यांनी केले.







