Other

जळगाव शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; खिसेकापू टोळी जेरबंद

जळगाव शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; खिसेकापू टोळी जेरबंद

सीसीटीव्ही आणि गुप्त माहितीच्या आधारे तिघांना अटक; चोरीस गेलेले १० हजार रुपये हस्तगत

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहरात वाढत्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत खिसेकापू टोळीतील तिघांना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेली १० हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

३० जुलै २०२६ रोजी दुपारी प्रकाश मेडिकल चौक ते महात्मा फुले मार्केटदरम्यान टीप-टॉप वेअर दुकानासमोर जावेद खान रसूल खान (वय ४०, रा. हमीदनगर, चोपडा; सध्या मासूमवाडी, जळगाव) यांच्या पँटच्या खिशातून अज्ञात चोरट्यांनी १० हजार रुपये लंपास केले होते. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध

गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला. त्यानुसार अर्शद शेख रज्जाक उर्फ चिकू शाहरुख (वय ३२), फारुख शेख हनीफ (वय २८) आणि शाकीर शेख शकील उर्फ घाऱ्या राजू (वय ३०, सर्व रा. गेंदालाल मिल परिसर, जळगाव) यांना ताब्यात घेण्यात आले.

पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या समक्ष चौकशी केली असता तिघांनी चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेले १० हजार रुपये जप्त करण्यात आले.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

या कारवाईत गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच नेत्रम आणि सीडीआर लोकेशन विभागातील कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शहरातील चोरीच्या गुन्ह्यांवर प्रभावी आळा घालण्यासाठी अशा धडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button