PoliticsSocial

जळगाव शहरात साकारणार ‘मिनी रिंग रोड’; आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

जळगाव शहरात साकारणार ‘मिनी रिंग रोड’; आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत करण्यासाठी आणि दळणवळणाला गती देण्यासाठी शिव कॉलनी स्टॉप ते शंभर फुटी रोडपर्यंतच्या महत्त्वाकांक्षी रस्त्याचे भूमिपूजन आ. सुरेश भोळे (राजुमामा) यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. वाघनगर, पीरबाबा दर्गा आणि गाडगेबाबा चौकाला जोडणारा हा मार्ग शहरासाठी खऱ्या अर्थाने ‘मिनी रिंग रोड’ ठरणार असल्याचे प्रतिपादन आ. भोळे यांनी यावेळी केले.

महाराष्ट्र शासनाच्या अधिवेशनादरम्यान शहरातील प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी हा निधी मंजूर करून घेण्यात आला आहे. या प्रक्रियेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे आ. सुरेश भोळे यांनी सांगितले. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर वाघनगर व परिसरातील नागरिकांची वाहतुकीची मोठी सोय होणार आहे.

दोन दिवसांत भूमिगत गटारांच्या कामाला सुरुवात या रस्त्याच्या कामासंदर्भात माहिती देताना आ. भोळे यांनी स्पष्ट केले की, या मार्गावर ज्या ठिकाणी भूमिगत गटारांचे काम अद्याप बाकी आहे, ते येत्या दोन दिवसांत सुरू करण्यात येईल. भूमिगत गटारांचे काम पूर्ण होताच प्रत्यक्ष रस्त्याच्या काँक्रिटीकरण व विकासाच्या कामाला तातडीने सुरुवात केली जाईल. केवळ रस्ता तयार करणे हाच उद्देश नसून, नागरिकांना दर्जेदार रस्ते आणि नियोजनबद्ध विकास उपलब्ध करून देणे हेच आमचे ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले.

मान्यवर व नागरिकांची मोठी उपस्थिती या भूमिपूजन सोहळ्यास महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, प्रभाग क्रमांक ११ चे नगरसेवक सिंधूताई कोल्हे, ललित कोल्हे, संतोष पाटील, अमृता सोनवणे तसेच प्रभाग क्रमांक ७ चे नगरसेवक चंद्रशेखर, अंकिता पाटील, विशाल भोळे आणि भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी शिवकॉलनी परिसरातील प्रा. डॉ. नितीन बारी, मनोज सावंत, मनोज भांडारकर, बंटी नेरपगारे, भिकन हिवराडे, योगेश पाटील, मनोज देवरे, आनंद साळी, संदीप जगताप, प्रीतम गुजर, फकिरा वाणी यांच्यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button