Other

फैजपूरात तहसील कार्यालयातील लिपिकाची आत्महत्या; परिसरात हळहळ

फैजपूरात तहसील कार्यालयातील लिपिकाची आत्महत्या; परिसरात हळहळ

फैजपूर (प्रतिनिधी) : फैजपूर येथील सराफ कॉलनीत राहणारे तथा यावल तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात लिपिक म्हणून कार्यरत असलेले सागर राजेंद्र तेली (वय ३५) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे फैजपूर शहरासह यावल तालुक्यात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सागर तेली यांनी दुपारी सुमारे १ वाजेच्या दरम्यान राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांनाही माहिती देण्यात आली.

सागर तेली हे यावल तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात कार्यरत होते. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळे ते परिसरात परिचित होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सहकारी कर्मचारी, मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर तेली यांच्यावर शुक्रवारी सकाळी ९ वाजता फैजपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र मोरे व विशाल मोहे करीत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button