पराक्रम दिना’निमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन*l

‘पराक्रम दिना’निमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन*l
१ ते १५ ऑगस्टदरम्यान स्पर्धा; विद्यार्थी व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव :महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त १८ ऑगस्ट हा दिवस ‘पराक्रम दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त १ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धांमध्ये शालेय, महाविद्यालयीन तसेच खुल्या गटातील नागरिकांना सहभागी होता येणार आहे. निबंध स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन व खुल्या गटासाठी, वक्तृत्व स्पर्धा शालेय, महाविद्यालयीन व खुल्या गटासाठी, तर रिल्स स्पर्धा महाविद्यालयीन व खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेचे स्वरूप, विषय, नियमावली, बक्षिसे तसेच सहभाग नोंदणीसंदर्भातील माहिती https://parakramdin.mahaamrut.org.in/ या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. प्रवेशिका स्वीकारण्याचा कालावधी १ ते १५ ऑगस्ट २०२६ असा असून, राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये तसेच इच्छुक नागरिकांनी या स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन ‘अमृत’ संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.







