राज्य शासन दिव्यांग विद्यालयात फळ वाटप

राज्य शासन दिव्यांग विद्यालयात फळ वाटप
जळगाव प्रतिनिधी महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष, महानगरतर्फे मंडळ २ येथे सिंधी कॉलनी परिसरातील दिव्यांग शाळा येथे फळवाटप करण्यात आले. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मनपा गटनेते प्रकाश बालाणी, मनोज काळे, रवी पाटील, मनोज भांडारकर, विनोद मराठे, शाम करणचंदानी, अनिल राजपाल आदी उपस्थित होते. .
पांझरापोळ गोशाळेत गोसेवा
भारतीय जनता पक्षाच्या मंडळ २ तर्फे पांझरापोळ गोशाळा येथे गोसेवा करण्यात आली. त्यांना चारा खाऊ घालून गोमातेचे महापौर दीपमाला काळे यांच्यासाठी आशीर्वाद घेण्यात आले. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मनपा गटनेते प्रकाश बालाणी, नगरसेविका ऍड. शुचिता हाडा, मनोज काळे, मिलिंद चौधरी, रेखा वर्मा, ऋषिकेश शिंपी, सरोज पाठक,आनंद सपकाळे, हर्षल सिखवाल, उमेश देशपांडे, तुषार सूर्यवंशी आदी उपस्थित होते.






